आज आम्ही एन्व्होक्लीन कंपनीच्या प्रस्तावित जैव-वैद्यकीय कचरा भस्मीकरण प्रकल्पाला अंबरनाथमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात मा. उद्योगमंत्री श्री उदय सामंत साहेब यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, अंबरनाथमध्ये असा प्रकल्प होऊ नये, ही आमची ठाम आणि स्पष्ट भूमिका आम्ही मांडली. नागरिकांच्या भावना, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि भविष्यातील धोके याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी अंबरनाथ शहराचे आमदार बालाजी किणीकर, नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अंबरनाथकरांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या जीवनमानाशी कोणतीही तडजोड आम्ही सहन करणार नाही. जनतेच्या हितासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत हा प्रस्ताव थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू.
जनतेचा विश्वास हीच माझी ताकद आणि अंबरनाथकरांसाठी माझा लढा कायम सुरूच राहील.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷