शहरातील नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवता यावे, यासाठी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
ज्या ठिकाणी पाणी साचले होते, नाले तुडुंब भरले होते तसेच रस्त्यांवर पाणी साठले होते, त्या सर्व ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीत व्यवस्था आणि अत्यावश्यक नागरी सुविधा अबाधित राहाव्यात यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. राजेश शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्री. सुनील जाधव, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेविका सौ. स्वाती पाटील, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापूसाहेब शिंदे तसेच शहर सरचिटणीस श्री. रणविजय यादव उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷